कार्यक्रमाच्या आरंभी, ज्या मित्रांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी जगाचा निरोप घेतला आहे, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली 🙏. त्यानंतर, सेवा निवृत्त झालेले व होऊ घातलेले हमीद पिंजारी व सुनील आप्पा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, नुकतीच पदोन्नती मिळालेले किशोर अण्णा व अनिल भिमराव यांचेही अभिनंदन करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला 🎉.
या दोन दिवसांच्या वास्तव्यात मित्रांनी स्विमिंगचा मनसोक्त आनंद घेतला 🏊♀️. विविध शारीरिक कसरती, व्यायाम आणि गप्पांच्या माध्यमातून मनावरचा ताण हलका केला 👫. या प्रसंगी बोलताना एका मित्राने नमूद केले की, "येथे गप्पांतून प्रत्येकाच्या शरीरात डोपामिन, ऑक्सीटोसीन आणि सेरोटोनिन सारखे आनंदी हार्मोन्स तयार होत होते, जणू हा आनंदाचा कारखानाच होता" 😊.
स्वरांच्या मैफिलीने रंगली संध्याकाळ 🎶. कमलाकर यांनी आपल्या हार्मोनियमच्या सुरावटींनी आणि कवितांनी वाढवली. तर कैलास बहारे यांनी सादर केलेल्या सुरेल गाण्यांनी सर्व मित्रांना मंत्रमुग्ध केले 🎵. या गाण्यांच्या मैफिलीत अनिल, दिलीप, सुनील, मनोज व संजय यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जुन्या आठवणींना उजाळा दिला 📚.
मैत्रीचा पुनरुच्चार 🤝
प्रशासकीय सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत असूनही राजेश शिरसाठ व किशोर अण्णा यांनी अत्यंत साध्या आणि मनमिळावू वृत्तीने वागून "मैत्रीत अहंकार नसतो" हे सिद्ध करून दाखवले 🤝. निरोप घेताना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते 🌟. "पुन्हा भेटू" या वचनासह आणि "घरी पोहोचल्यावर फोन करा" या काळजीयुक्त सादेने कार्यक्रमाची सांगता झाली 📞.
स्नेहसंमेलनाचे यश 🎉
यांची लाभली उपस्थिती 🙏. या स्नेहसंमेलनासाठी सर्वश्री संजय शिनकर, राजेश शिरसाठ, यशवंत पाटील, हमीद पिंजारी, सोनू राजपूत, कमलाकर संदांशिव, सुनील चौक, श्याम नेरपगार, दिलीप भिमराव, जे. एस. पाटील, अनिल भिमराव, मनोज शिंपी, किशोर अण्णा, सुनील आप्पा, संजय लोटन, कैलास बहारे आणि अनिल चौधरी उपस्थित होते 🌈.
- अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील बी. ए. इंग्लिश बॅचच्या १७ मित्र एकत्र येऊन दोन दिवस आनंदाची उधळण केली
- कार्यक्रमाच्या आरंभी, ज्या मित्रांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी जगाचा निरोप घेतला आहे, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली
- सेवा निवृत्त झालेले व होऊ घातलेले हमीद पिंजारी व सुनील आप्पा यांचा विशेष सन्मान करण्यात आला
"राग, लोभ आणि मत्सर विरहित नाते म्हणजे मैत्री" 🙏. ९०-९१ च्या बॅचमधील आम्ही मित्र पुन्हा एकदा एकमेकांना एकेरी नावाने हाक मारताना अहंकाराचा विसर पडला होता, हेच या संमेलनाचे सर्वात मोठे यश आहे 🎉.



