Lokman News
ताज्या बातम्या
"वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!" "वारीचा उत्साह, सेवाभावाचा गंध; रक्तदान-आरोग्य शिबिरातून जपला मानवतेचा संबंध!" "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!" "वारीचा उत्साह, सेवाभावाचा गंध; रक्तदान-आरोग्य शिबिरातून जपला मानवतेचा संबंध!" "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!" "वारीचा उत्साह, सेवाभावाचा गंध; रक्तदान-आरोग्य शिबिरातून जपला मानवतेचा संबंध!"
ताज्या बातम्या

गिरणा नदीवरील बाभोरी पुलासाठी केंद्राची मंजुरी; जळगावच्या वाहतुकीला दिलासा बातमी

Anil Chaudhari २०/१/२०२६
गिरणा नदीवरील बाभोरी पुलासाठी केंद्राची मंजुरी; जळगावच्या वाहतुकीला दिलासा बातमी
लोकमन न्यूज..अनिल चौधरी जळगाव : लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे गिरणा नदीवर बाभोरी येथे नवीन पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारने ७९ कोटी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नॅशनल हायवेवरील वाढती वाहतूक लक्षात घेता हा पूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार असून, त्यामुळे भविष्यातील वाहतूक समस्यांवर तोडगा निघणार आहे. या प्रकल्पामुळे जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल. खा. स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, जळगावचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून, हा पूल मतदारसंघासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासोबतच गिरणा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती व मजबुतीकरण, कालिका माता ते खोटेनगर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग पद्धतीने काँक्रिटीकरण व गटार बांधकामालाही गती मिळणार आहे. या सर्व विकासकामांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. या मंजुरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत.
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD