Lokman News
ताज्या बातम्या
तृतीयपंथी बांधवांच्या हाताला रोजगाराची ‘रिक्षा’! ज्ञान देणाऱ्या हातांचा सन्मान; समाज घडविणाऱ्या विचारांना सलाम! 🩸 श्रावण सांगतेला भक्तीला रक्तदानाची जोड; कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आज रक्तदान शिबिर! 🌺 🌹 ‘शिक्षक’ म्हणून घडविताना समाजालाही दिशा; प्रा. हिरालाल पाटील यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव! 🌹 🌿 कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 🌿 अमळनेर बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू! तृतीयपंथी बांधवांच्या हाताला रोजगाराची ‘रिक्षा’! ज्ञान देणाऱ्या हातांचा सन्मान; समाज घडविणाऱ्या विचारांना सलाम! 🩸 श्रावण सांगतेला भक्तीला रक्तदानाची जोड; कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आज रक्तदान शिबिर! 🌺 🌹 ‘शिक्षक’ म्हणून घडविताना समाजालाही दिशा; प्रा. हिरालाल पाटील यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव! 🌹 🌿 कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 🌿 अमळनेर बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू! तृतीयपंथी बांधवांच्या हाताला रोजगाराची ‘रिक्षा’! ज्ञान देणाऱ्या हातांचा सन्मान; समाज घडविणाऱ्या विचारांना सलाम! 🩸 श्रावण सांगतेला भक्तीला रक्तदानाची जोड; कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आज रक्तदान शिबिर! 🌺 🌹 ‘शिक्षक’ म्हणून घडविताना समाजालाही दिशा; प्रा. हिरालाल पाटील यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव! 🌹 🌿 कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 🌿 अमळनेर बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू!
अमळनेर

कपिलेश्वर येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराजांचा २९वा संन्यास दीक्षा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १२/२/२०२६
कपिलेश्वर येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराजांचा २९वा संन्यास दीक्षा वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोकमन न्यूज..अनिल चौधरी निंब, अमळनेर. “चलो कपिलेश्वर” या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत आज गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर, मुडावद-निंब (तापी–पांझरा संगम) येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज गुरुवर्य (मठाधिपती) यांचा २९वा संन्यास दीक्षा वर्धापन दिन अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या पावन प्रसंगी भारतातील विविध भागांतून आलेल्या प्रमुख संत-महंतांच्या उपस्थितीत धार्मिक विधी, पूजन, प्रवचन व संतसमागम संपन्न झाला. स्वामी हंसानंद तीर्थ महाराजांच्या दर्शनाने व प्रवचन श्रवणाने भक्तांना अध्यात्मिक समाधान लाभले. संतदर्शन व प्रवचनाने संसारिक अडचणींना दिशा मिळते, सुप्त पापांचे क्षालन होते—असा भाविकांचा अनुभव यावेळी व्यक्त झाला. कार्यक्रमासाठी भाविक भक्त बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या महान पुण्यपर्वाचा लाभ घेतला. स्वतःसोबतच इतरांनाही या दिव्य संधीचा लाभ मिळावा, या उद्देशाने मंदिर ट्रस्ट व भक्त मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. आपले नम्र, श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट स्वामी हंसानंद तीर्थ महाराज भक्त मंडळ मुडावद-निंब, तापी–पांझरा संगम
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD