Lokman News Logo
ताज्या बातम्या
अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला मोठे यश! योजनाबाह्य कामांच्या सक्तीतून राज्य शासनाकडून सुटकाजिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास!करिश्मा नायर यांचे हे आहेत खास गुण.जळगावात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? प्रशासनाला निष्पाप बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का?'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!वारकरी आणि सुसंस्कृत विचारांचा वारसा! निंबच्या पाटील परिवारातर्फे अण्णासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कीर्तन.अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला मोठे यश! योजनाबाह्य कामांच्या सक्तीतून राज्य शासनाकडून सुटकाजिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास!करिश्मा नायर यांचे हे आहेत खास गुण.जळगावात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? प्रशासनाला निष्पाप बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का?'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!वारकरी आणि सुसंस्कृत विचारांचा वारसा! निंबच्या पाटील परिवारातर्फे अण्णासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कीर्तन.अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला मोठे यश! योजनाबाह्य कामांच्या सक्तीतून राज्य शासनाकडून सुटकाजिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास!करिश्मा नायर यांचे हे आहेत खास गुण.जळगावात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे? प्रशासनाला निष्पाप बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का?'जसा मित्र तसे संस्कार'कर्णाची निष्ठा, सुदाम्याचे प्रेम आणि श्रीकृष्णाची साथ; असा असावा जीवनातील खरा मित्र!वारकरी आणि सुसंस्कृत विचारांचा वारसा! निंबच्या पाटील परिवारातर्फे अण्णासाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कीर्तन.
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बालकांना मोठा दिलासा. जिल्ह्यातील अंगणवाड्या आता सकाळच्या सत्रात भरणार!

लोकमन न्यूज..अनिल चौधरी ६/४/२०२६
अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बालकांना मोठा दिलासा. जिल्ह्यातील अंगणवाड्या आता सकाळच्या सत्रात भरणार!
✅ महत्त्वाचा निर्णय

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेपासून चिमुकल्यांचे संरक्षण! अमळनेर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांची वेळ आता सकाळच्या सत्रात, मा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींचा आदेश.

(प्रतिनिधी लोकमन न्यूज निंब अमळनेर) मुंबई: वाढत्या उन्हाची तीव्रता आणि बालकांच्या आरोग्यावर होणारा त्याचा विपरीत परिणाम लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची वेळ बदलून सकाळच्या सत्रात करण्यात आली आहे. हा महत्त्वाचा निर्णय अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी. पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे मोठे यश असून, मा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी या बदलाचे अधिकृत आदेश पारीत केले आहेत.

मा. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार, दि. १ एप्रिल २०२६ ते दि. ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या केवळ सकाळच्या सत्रातच चालतील, जेणेकरून चिमुकल्यांना कडक उन्हाचा त्रास होणार नाही.

अंगणवाडीचे नवीन वेळापत्रक: चिमुकल्यांच्या सोयीसाठी बदल

📌 महत्त्वाचे मुद्दे:

  • सकाळी ७.०० ते ७.१५: अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी करणे.
  • सकाळी ७.१५ ते ८.१५: पूर्व शालेय शिक्षण.
  • सकाळी ८.१५ ते ८.३०: लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे.
  • सकाळी ८.३० ते १०.१५: पूर्व शालेय शिक्षण.
  • सकाळी १०.१५ ते १०.४५: लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार वाटप.
  • सकाळी १०.४५ ते ११.३०: पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर नोंदी घेणे तसेच दप्तर लिहिणे.
  • सकाळी ११.३० ते १२.००: संदर्भ सेवा.
  • दुपारी १२.०० ते ०१.३०: गृहभेटी, आरोग्य विषयक मार्गदर्शन, समुपदेशन आणि कुपोषित बालकांना आहार वाटप.

अंगणवाडी केंद्रांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याबाबत युनियनने केलेल्या मागणीला यश आल्याने उन्हाच्या कडाक्यापासून चिमुकल्यांचा बचाव होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी युनियनचे व प्रशासनाचे आभार मानले असल्याची माहिती रामकृष्ण बी. पाटील यांनी दिली आहे.

(वृत्त संकलन : पंकज पाटील, अमळनेर)

जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD